अखिल भारतीय जनजागृती अभियानाद्वारे विविध कायद्यांची माहिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय जनजागृती अभियानाद्वारे विविध कायद्यांची माहिती

अहमदनगर : (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अहमदनगर जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान अखिल भारत

पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी
श्रीगोंद्यात खा. शरद पवारांच्या हस्ते होणार रयत संकुलच्या इमारतीचे उद्धाटन

अहमदनगर : (प्रतिनिधी)- 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अहमदनगर जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा यांच्या हस्ते करण्यात आला.

नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता गावातून या जनजागृती अभिनयाची सुरुवात दिनांक 3 ऑक्टोबर पासून करण्यात आली. या अभियानात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्ञानेश्वर दंडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार, पुरुष वारस हक्क कायदा, महिला वारस हक्क कायदा, गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा अशा विविध कायद्यांची माहिती दिली.

अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्ती, अवैध मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी, स्त्रिया अथवा बालके, अपंग व्यक्ती ज्या व्यक्ती अंधत्व कुष्ठरोग किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास असमर्थ आहेत, सार्वत्रिक आपत्ती (जातीय हिंसाचार, जातीय अत्याचार, पुर, दुष्काळ, भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीचे बळी, औद्योगिक कामगार तसेच वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना विधी सेवा प्राधिकरण समिती मार्फत मोफत विधी सेवा पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय जनजागृती अभियान अंतर्गत नगर तालुक्यात 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान रोज 44 गावात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी 11 न्यायाधीशांची टीम बनवण्यात आली असल्याचेही अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री दंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वडगाव गुप्ता चे सरपंच विजय शेवाळे, पोलीस पाटील नंदकुमार शेवाळे, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, माजी उपसरपंच गणेश डोंगरे, शिवाजी घाडगे, बबन कोऱ्हाळे, ग्रामपंचायत सदस्य उमेश डोंगरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हुसेन सय्यद, लक्ष्मण गव्हाणे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण शिंदे, सावित्राम गुडगळ, आरोग्य अधिकारी सौ कांबळे, कृषी सहाय्यक सौ गिरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ शिंदे, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्‍वर अडसुरे यांनी केले.

COMMENTS