अकोले : येथील तहसील कार्यालय व अकोले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.३०) सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयामध्ये 39 व्या राष्ट्री
अकोले : येथील तहसील कार्यालय व अकोले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.३०) सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयामध्ये 39 व्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी शासकीय विविध दाखले, रेशनपुरवठा, वीजपुरवठा, वीज बिले, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, बी बियाणे, कृषी खते, वन खाते, कृषी खाते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फी आदिवासी आश्रम शाळांमध्ये दर्जेदार सुविधा मिळत नाही, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू कार्यालये, आधार, पशुसंवर्धन, पंचायत समिती यासह अनेक दैनंदिन कामातील सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे.
तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार किसन लोहारे, पुरवठा निरीक्षक संदीप निळे, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, महेश नवले, दत्ता शेणकर, प्रा.डॉ.सुनील शिंदे, सिताराम भांगरे, माधवराव तिटमे, अनंत घाणे, सुनील देशमुख, राम रुद्रे, आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
मेळाव्यास ग्राहकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामहरी तिकांडे, राजेंद्र घायवट, सखाराम खतोडे, भाऊसाहेब वाळुंज, राम भांगरे, दत्ता ताजणे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रमोद मंडलिक, रामदास पांडे, बाळासाहेब बनकर, रामदास पवार आदींनी केले आहे.

COMMENTS