अंबानींच्या घरासमोरील गाडीतील स्फोटके समृद्धी महामार्गाची

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबानींच्या घरासमोरील गाडीतील स्फोटके समृद्धी महामार्गाची

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या गाडीतील स्फोटके प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’, शिवसेनेची विरोधी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर खोचक टिप्पणी (Video)
घराणेशाही, कुटूंबशाही मतदारांनी उद्ध्वस्त करावी!
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाडिक गटाची एंट्री; कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष

मुंबई / प्रतिनिधीः उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या गाडीतील स्फोटके प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या स्फोटकांचा संबंध आता राज्य सरकारच्या अखत्यारित सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाशी जोडण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेल्या 20 कांड्या समृद्धी महामार्ग बनविण्यासाठी केला जात आहे. 

या कांड्या नागपूरमधील एका कंपनीत बनवल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. संबंधित जिलेटिनच्या कांड्या स्कॉर्पिओ गाडीत कशा आल्या किंवा या कांड्या सचिन वाझेला कोणी दिल्या, याचा तपास एऩआयएकडून केला जात होता. याप्रकरणी एनआयएने नुकतीच एका माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकार्‍याची चौकशी केली आहे. या चौकशीत ठाण्यातील एका व्यावसायिकाचा संबंध उघड झाला आहे. संबंधित माजी पोलिस अधिकार्‍याचे ठाण्यातील व्यावसायिकाशी आणि सचिन वाझेशी घनिष्ठ संबंध आहेत. ठाण्यातील हा व्यावसायिक या महामार्गाच्या कामाशी संबंधित असून त्याला या महामार्गासाठी वापरण्यात येणार्‍या जिलेटिनच्या कांड्या चोरून आणणे सहज शक्य होते. त्यामुळे या व्यावसायिकावर जिलेटिनच्या कांड्या आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच महामार्गाच्या कामातील 20 जिलेटीनच्या कांड्या संबंधित व्यावसायिकाने चोरल्या होत्या. तसेच या कांड्यांचा वापर कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्याकरता झाला होता. ठाण्यातील हा व्यावसायिक आधीपासूनच एनआयएच्या रडारवर होता; पण पुराव्याअभावी त्याला चौकशीसाठी बोलण्यात आले नव्हते. पण माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकार्‍याची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणांना या व्यावसायिकाच्या भूमिकेबद्दल अधिक स्पष्टता आली आहे. या प्रकरणी आता संबंधित व्यावसायिकाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर माजी एन्काऊंटर स्पेशालिस्टचीही पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच कार माइकल रोडवरील स्कॉर्पिओप्रकरणी लवकरच संबंधित माजी पोलिस अधिकार्‍यासह ठाण्यातील व्यवसायिकाला अटक करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS