अंगणवाडी सेविकांचा काळा बाजार उघडकीस… गावकरी संतापले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांचा काळा बाजार उघडकीस… गावकरी संतापले (Video)

राज्यातील सहा वर्षाखालील  बालकांना कुपोषणच्या बचावापासून राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहेत. परंतु घनसावंगी तालुक्यातील बोधलापूरी या गावात मागील

नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त
जनरल उपेन्द्र द्विवेदी बनले नवे लष्करप्रमुख
गाईला वाचविण्याचा प्रयत्नात चौघांचा मृत्यू.

राज्यातील सहा वर्षाखालील  बालकांना कुपोषणच्या बचावापासून राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहेत. परंतु घनसावंगी तालुक्यातील बोधलापूरी या गावात मागील दोन वर्षापासून पोषण आहार वाटप होत  नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

बालकांना पोषण आहार वाटप न करताच साठवणूक करून ठेवल्याने  येथील गावकरी संतप्त झाले आहेत .या गावात दोन अंगनवाड्या आहेत .मागील काही दिवसांपासून पोषण आहार मिळत नसल्याने गावकऱ्यांनी याचा शोध घेत आसताना चक्क पोषण आहाराची वाटप न करताच एका खोलीत साठवनुक केल्याचे दिसून आले.


गावकऱ्यांच्या सांगण्यावरून  हा पोषण आहार चोरीच्या उद्देशाने ठेऊन काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवल्याचा गावकऱ्यांचा आरोप होत आहे. या प्रकरणी  चौकशी करून पोषण आहार गोरगरिब बालकांना वेळेत वाटप करून या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.

COMMENTS