कोपरगाव शहर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात यंदा ध्वजारोहणाचा कार्यक्रम विशेष पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेले नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांच्या धर्मपत्नी मंगल सुनील वलटे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून शुक्रवार (दि. १ मे २०२६) रोजी सकाळी ७.३० वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात ध्वजारोहण होणार आहे. १ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. राज्यस्तरावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते, तर राज्यभरातील शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव पंचायत समितीने यंदा वीरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी तसेच पंचायत समितीअंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे.

कोपरगाव शहर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात यंदा ध्वजारोहणाचा कार्यक्रम विशेष पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेले नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांच्या धर्मपत्नी मंगल सुनील वलटे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून शुक्रवार (दि. १ मे २०२६) रोजी सकाळी ७.३० वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात ध्वजारोहण होणार आहे.
१ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. राज्यस्तरावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते, तर राज्यभरातील शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
याच पार्श्वभूमीवर कोपरगाव पंचायत समितीने यंदा वीरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी तसेच पंचायत समितीअंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे.

COMMENTS