Madha : रस्त्याच्या निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठी आमरण उपोषण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Madha : रस्त्याच्या निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठी आमरण उपोषण (Video)

माढा तालुक्यातील आढेगाव ते गारअकोले रस्त्याचे आठ ते नऊ किलोमीटरचे काम दोन महिन्यांपुर्वी पूर्ण झाले आहे. साईट पट्ट्यांचे काम अजून बाकी असतानाच डांबरी

Madha : लोक न्यूज २४ चॅनेलचा दणका रस्त्याचे काम होणार सुरु (Video)
Madha : बाजारपेठेत येण्यासाठी मोडनिंब-करकंब मुख्य मार्ग (Video)
Madha – भा,ज,पा करमाळा तालुका समर्थ बुथ अभियान संपन्न l LokNews24

माढा तालुक्यातील आढेगाव ते गारअकोले रस्त्याचे आठ ते नऊ किलोमीटरचे काम दोन महिन्यांपुर्वी पूर्ण झाले आहे. साईट पट्ट्यांचे काम अजून बाकी असतानाच डांबरी रस्ता पुर्णपणे खड्डेमय बनला आहे. ऑइलमध्ये डांबर मिक्स करून रस्ता तयार केल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला झाल्याची चर्चा आहे.

निकृष्ट दर्जाचा रोड असल्यामुळे दुरूस्ती करूनही काही उपयोग होणार नाही. गावांमध्ये तसेच आसपासच्या गावांमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर तिथून जात असतात.  ज्या रस्त्याची चार चाकी आणि दोन चाकी वाहने जाऊन अशी बिकट अवस्था होऊ शकते .त्या रस्त्यावरून उसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्यापर्यंत पोचवणे म्हणजे जणू तारेवरची कसरतच ठरत आहे.

विश्वकर्मा लोहार विकास संस्थेच्या माध्यमातून रस्ताच पुन्हा तयार करण्यात यावा या मागणीसाठी गाडे वस्ती या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, शेकापचे बाळासाहेब पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन बागल, जिल्हा अध्यक्ष रामदास खराडे, विठ्ठल मस्के, निवृत्ती तांबे, भारत माने, अर्जुन चव्हाण, रामभाऊ टकले, सुरज चव्हाण, अजित घाडगे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू लेंगरे, आजिनाथ तांबवे, तानजी माने उपस्थित होते.

COMMENTS