Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड जनता बँकेतच्या ठेवीदारांची दिवाळी गोड: 35 हजार ठेवीदारांना 302 कोटीचे वाटप

कराड/ प्रतिनिधी : दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या 5 लाख व त्याच्या आतील रकमेची ठेव असलेल्या 90 टक्के ठेवीदारांचे पैसे बँकेने परत

बसवर ’जय महाराष्ट्र’ लिहून गाडीला फासले काळे; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद
दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रवेशोत्सव फेरी उत्साहात

कराड/ प्रतिनिधी : दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या 5 लाख व त्याच्या आतील रकमेची ठेव असलेल्या 90 टक्के ठेवीदारांचे पैसे बँकेने परत केले आहेत. दिवाळीच्या तोंडावर रक्कम परताव्याला गती आल्याने ठेवीदारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच लाख रुपयांपर्यंत ठेव असलेल्या 39 हजार 32 पैकी 35 हजार 352 ठेवीदारांचे पैसे परत करण्यात आले आहे. बँकेने मंजूर केलेल्या 329 कोटी 10 लाख रुपयांपैकी 301 कोटी 80 लाखांच्या ठेवी परत करण्यात आल्या. एप्रिल 2021 मध्ये पैसे परताव्याला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार अवघ्या सात महिन्यांत बँकेने मंजूरपैकी 90 टक्के सभासदांच्या ठेवींची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली. अद्यापही 93 हजार सभासदांच्या 62 कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल असून, त्यालाही मुंजरी मिळेल.
कजदारांनी घेतपेल्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली. अशा परिस्थिती गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी एप्रिल महिन्यात मंजूरी मिळाली होती. त्यानुसार बँकेच्या केवायसी पुर्ण केलेल्या 5 लाखांच्या आतील 40 हजार 415 ठेवीदारांचे 348 कोटी 10 लाख रुपये परताव्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल होते. त्यापैकी 39 हजार ठेवीदारांचे 329 कोटी 76 लाख रुपयांना मंजुरी मिळून कराड जनता बँकेच्या खात्यात एप्रिल 2021 मध्ये जमा झाले होते. सात महिन्यांत ठेवीदारांच्या रकमेचा परतावा झाला आहे. बँकेत पाच लाखांच्या आतील 1 लाख 33 हजार 421 ठेवीदार होते. त्याचे 527 कोटी 70 लाखांच्या ठेवी बँकेकडे आहेत. त्यातील 40 हजार 415 ठेवीदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानुसार 348 कोटी 10 लाखांच्या रक्कम परताव्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे गेले. त्यानुसार 90 टक्के ठेवीदारांची रक्कम परत देण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रत्यक्षात त्या 90 टक्के ठेवीदारांना पैसेही परत दिले आहेत.

COMMENTS