समीर वानखेडेला वर्षभरात तुरूंगात टाकणार – मलिक यांचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेला वर्षभरात तुरूंगात टाकणार – मलिक यांचा इशारा

पुणे - ड्रग्ज प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाल मलिक यांनी आक्रमक

नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)
नवाब मलिकांचा मुक्काम कोठडीतच

पुणे – ड्रग्ज प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाल मलिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, एनसीबीचे अधिकारी त्यांच्या निशाण्यावर आहेत. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असे खुले आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्‍चित आहे, असे वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केल्यामुळे खळबळ उडाली.
मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळभ बोलतांना मलिक म्हणाले की, राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझे काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणार्‍या बापाचे नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचे उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केला.

COMMENTS