कोरोना लसीकरणाचा गाठला 100 कोटींचा टप्पा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना लसीकरणाचा गाठला 100 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाविरोधातील लढाईत भारताने एक ऐतिहासिक यश गुरूवारी मिळवले. भारताने कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा गुरूवारी गाठल

महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे वास्तव !
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाविरोधातील लढाईत भारताने एक ऐतिहासिक यश गुरूवारी मिळवले. भारताने कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा गुरूवारी गाठला. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून संघटनेचे प्रमुख महासंचालक टेडॉर्स घेब्रायासस यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.
भारताचे लसीकरणाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशात सुमारे 75 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 31 टक्के प्रौढ लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत. 16 जानेवारी रोजी भारताने आरोग्य कर्मचार्‍यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्याच्या आधारे लस देण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळपर्यंत सुमारे 1.03 कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना पहिला डोस मिळाला आहे आणि 90.98 लाखांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, 1.83 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे, तर 1.55 कोटींना दोन्ही डोस मिळाले आहेत.
दरम्यानच्या काळात लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने 100 कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे. गेल्या दीड वर्षांच्या काळात भारताच्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येने मोठ्या धैर्याने कोरोनासारख्या घातक लाटेला यशस्वी तोंड दिले. याच काळात भारतीय वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्राने मोठी मजल गाठत विविध लसींच्या उत्पादनापर्यंत विक्रम केले आणि आता तर त्याहीपेक्षा मोठा टप्पा गाठून देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरण पूर्ण केले आहे. 100 कोटींचा टप्पा इतक्या अल्पावधीत गाठणे ही खूप मोठी कामगिरी मानली पाहिजे. यासाठी सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, तेथील सर्व अधिकारी कर्मचारी, डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे.

जगातील प्रत्येक 100 पैकी 15 डोस भारतातील
कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला 1 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला.जगातील 100 पैकी 15 डोस हे भारतातील नागरिकांना दिले गेले.

COMMENTS