काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?

उत्तरप्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाल्याचे मागील काही वर्षांतील घटनांचा आधार घेतला तर दिसून येते.

निर्यातबंदी आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न
रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका
अपघात आणि सुरक्षेची चिंता

उत्तरप्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाल्याचे मागील काही वर्षांतील घटनांचा आधार घेतला तर दिसून येते. उत्तरप्रदेशात गेल्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे, तेथील राजकीय वातावरण तापतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशात काँगे्रसचे अस्तित्व नगण्य असतांना देखील, प्रियंका गांधी ज्या त्वेषाने तिथे योगी आदित्यनाथ यांना टक्कर देत आहे, ते पाहता आगामी निवडणुकांमध्ये काँगे्रस मोठया प्रमाणावर करिश्मा दाखवू शकते.
कालच उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत महिलांना 40 टक्के प्रतिनिधित्व देण्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. ही एक विधायक घोषणा असून, लडकी हू, लड सकती हू हे केलेले विधान महिला वर्गांना अतिशय भावक वाटले. एकीकडे विधायक, रचनात्मक कार्यक्रम हाती घेत असतांना प्रियंका योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. लखीमपूर खेरी येथील शेतकर्‍यांना चिरडण्याचा प्रकार असेल, तिथे सर्वप्रथम प्रियंका गांधी पोहचल्या, त्यानंतर कितीतरी दिवसांनंतर राहुल गांधी तिथे पोहचले. वास्तविक पाहता शेतकर्‍यांना चिरडण्यासारख्या भयंकर घटनेत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधीनी तिथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र राहुल गांधी केरळमध्ये क्षुल्लक कार्यक्रमांमध्ये व्यक्त होते. याचसोबत दुसरी घटना म्हणजे बुधवारी उत्तरप्रदेशात पोलिस कोठडीतील एका तरूणाचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच, प्रियंका गांधी या संबंधित कुटुंबांची भेट घेण्यासाठी निघाल्या असत्या, पोलिसांनी पुन्हा त्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यामुळे उत्तरप्रदेश पोलिस प्रियंका गांधी यांना का घाबरत आहे.
उत्तरप्रदेशातील निवडणुकांना वेळ असतांना, प्रियंका गांधी या संपूर्ण ताकदीने लढतांना दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडणारा किंवा, त्यांच्याशी टक्कर देणारा नेता सध्या उत्तरप्रदेशात नाही. मायावती सध्या आक्रमकपणे भाजपला प्रश्‍न विचारतांना दिसून येत नाही. तर दुसरीकडे अखिलेश यांनी भाजपला विरोध करण्याऐवजी यात्रा करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना विरोध करण्यासाठी कुणी प्रबल नेता नाही, ती उणीव सध्या प्रियंका गांधी भरून काढतांना दिसून येत आहे. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वगुणाची विशेष प्रचिती या दोन आठवडयातील कार्यक्रमावरून दिसून येते. त्यांच्यात कमालीचे सातत्य आहे. त्यांच्यात धरसोड वृत्ती नाही. त्यामुळे सातत्याने त्या उत्तरप्रदेशात थांबून सरकारची कोंडी करत, त्यांच्या उणीवा जनतेसमोर मांडत आहे. शिवाय प्रियंका गांधीमध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेसारखीच हुबेहुब प्रतिमा, बोलण्याची लकब या सर्व गोष्टीमुळे त्यांचे व्यक्तीमत्व हे आकर्षित करणारे आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा मिळेल यात शंका नाही. जर प्रियंका गांधी या ज्याप्रकारे योगी आदित्यनाथ यांना टक्कर देत आहे, असाच त्यांचा पावित्रा विधानसभा निवडणुकांपर्यंत राहिला तर, काँगे्रसला उत्तरप्रदेशात अच्छे दिन येऊ शकतात. इंदिरा गांधी आणि प्रियंका यांच्या पेहरावाची पद्धत एकच आहे. त्यांच्यात बरीच साम्यस्थळंही आहेत. जसे की इंदिरा गांधी लोकांना आपल्या वाटायच्या. त्या लोकांमध्ये सहज मिसळायच्या. त्यांच्या चेहर्‍यात करारीपणा होता, पण लोकांमध्ये जाताना मार्दवही होते. प्रियंका गांधी काही बाबतीत तशा आहेत. त्या लोकांमध्ये सहज मिसळतात. सहजपणे संवाद साधण्याची त्यांच्यात हातोटी आहे. त्या कुणालाही पटकन आपलसं करु शकतात. उत्तर प्रदेश आणि एकूण भारतात जसे इंदिराजींना अपील होते, तसेच अपील प्रियंका गांधींनाही आहे. उत्तर प्रदेशात तर त्याचा बराच फरक पडेल. कारण इथे अजूनही इंदिरा गांधींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे प्रियंकांचा चेहरा, त्यांची स्टाईल, पेहराव आणि दिसणं या लोकांना पुन्हा एकदा इंदिरा गांधी आपल्यात आल्याची आठवण करुन देत आहे. यात शंका नाही, शिवाय प्रियंका ज्या त्वेषाने उत्तरप्रदेशात लढत आहे, तो त्वेष त्यांचा असाच राहिला, तर काँगे्रसला उत्तरप्रदेशात अच्छे दिन येऊ शकतात.

COMMENTS