अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन डॉक्टरने केली आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन डॉक्टरने केली आत्महत्या

पाथर्डी : तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले डॉ. गणेश शेळके यांनी वरीष्ठ

धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा
बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : राहुल गांधी यांच्याकडे नंदकुमार कुंभार यांची मागणी
वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…

पाथर्डी : तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले डॉ. गणेश शेळके यांनी वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.सदरील घटनेनंतर आरोग्य विभागामध्ये व प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली असून दोषीवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस हवालदार अरविंद चव्हाण,सतीश खोमने भाउसाहेब तांबे व सपोनि कौशल्य निरंजन वाघ यांनी धाव घेतली.

याबाबत प्राथमिक माहिती मिळालेली अशी की,पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ. गणेश शेळके हे उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणून काम कार्यरत होते.शेळके हे ड्युटीवर आले तेव्हा तणावाखाली होते.उपकेंद्रावर आल्यानंतर मी राजीनामा देणार असल्याचे सांगत पेन व कागद घेत दालनात जात त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला.काही वेळाने नर्सने जेवनासाठी डॉ.शेळके यांना आवाज दिला.मात्र आतुन काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन त्यांना फोन लावला तर त्यांनी फोनही उचलला नाही म्हणुन सर्व नर्स सेविकांनी खिडकीतुन पाहीले तर डॉ.शेळके यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला दोरी लावुन गळफास घेतल्याचे दिसून आले.

डॉ. गणेश शेळके यांनी लिहलेली सुसाईड नोट..

मी डॉ. गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरीक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे, या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे.

COMMENTS