राष्ट्रीय पातळीवरील कृषी नारी सन्मान पुरस्कार सौ. शालिनीताई विखे पाटील यांना जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय पातळीवरील कृषी नारी सन्मान पुरस्कार सौ. शालिनीताई विखे पाटील यांना जाहीर

लोणी दि.२२ प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  सौ.शालिनीताई विखे पाटील यांना टाटा केमिकल सोसायटी ऑफ रुरल डेव्हलपमेंट,कृषी विकास व ग्रा

नवरात्र उत्सवात केडगाव देवीच्या मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी
माजी मंत्री राम शिंदेंना मोठा झटका… भाजपचा बडा नेता गेला राष्ट्रवादीत
जिल्हा लोकल रिट कोर्ट सत्याग्रह जारी

लोणी दि.२२ प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  सौ.शालिनीताई विखे पाटील यांना टाटा केमिकल सोसायटी ऑफ रुरल डेव्हलपमेंट,कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  राष्ट्रीय पातळीवरील कृषी नारी सन्मान पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत.  तसेच त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने वरील दोन्ही संस्थांच्या वतीने महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. लोणी येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सौ.विखे पाटील यांनी  राहाता तालुक्याबरोबरच जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन केले महिला बचत गटाच्या स्थापनेत  विखे पाटील  यांचे मोलाचे योगदान आहे. 

आज त्या राहाता तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजार महिलांचे नेतृत्व करीत आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी विविध योजना आणि उपक्रम सातत्याने आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . कस्तुरीच्या (टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट) या राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख डाॅ.मुग्धा शहा आणि कृषी विकास प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

या पुरस्काराविषयी प्रतिक्रिया देतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने आपण ग्रामीण भागातील महिलांपर्यंत विविध सरकारी योजनांचा  लाभ पोहोचवण्यास प्राधान्य दिले. 

महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत  हा पुरस्कार महिलांना समर्पित आहे आजपर्यत अनेक पुरस्कार मिळाले  परंतु महीलांच्या उन्नतीसाठी चांगले काम करण्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून नवी प्रेरणा मिळाल्याचं सांगून हा पुरस्कार संस्थेच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे असे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS