Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौ.के.एस.के. महाविद्यालयाची डिपेक्स 2026 विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट

बीड : सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथील विज्ञान मंडळातर्फे डिपेक्स 2026 या राज्यस्तरीय विज्ञा

गॅसटंचाईचे संकट आणि सरकारची कसोटी
भारतातील इंधन गॅस टंचाई : वास्तव की कृत्रिम संकट ?
देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प; अनेक राज्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सापडला संकटात

बीड : सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथील विज्ञान मंडळातर्फे डिपेक्स 2026 या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट देण्यात आली. हे प्रदर्शन एम. आय. टी. महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 05 मार्च  ते 08 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
शनिवार दिनांक 07 मार्च 2026 रोजी महाविद्यालयातील आठ प्राध्यापक व 21 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प, संशोधनात्मक मॉडेल्स, तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग व नाविन्यपूर्ण कल्पनांचा अभ्यास करून त्यांची सविस्तर माहिती घेतली. प्रकल्प पाहून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना समजल्या तसेच विज्ञानाच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडविण्यासाठी संशोधन कसे करता येते याचीही प्रेरणा मिळाली. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवीन तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक प्रकल्प, ऊर्जा बचत, रोबोटिक्स आणि विविध संशोधनात्मक प्रयोग याविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास तसेच संशोधनाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत झाली. या शैक्षणिक भेटीस विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा. रुपेश कोकाटे, डॉ. जोगदंड संध्या, डॉ. गवारे सोनाली, डॉ.झगरे मंजुश्री, डॉ. गायके पी. पी., प्रा. दीपक पवार व श्री. संभाजी जाधव हे प्राध्यापक सहभागी झाले होते. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ. ए. एस. खान, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर तसेच कमवि विभागाचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे यांचे मार्गदर्शन लाभले

COMMENTS