आर्यन खान करतोय देवाचा धावा… जेलमधील आरतीला लावतोय हजेरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्यन खान करतोय देवाचा धावा… जेलमधील आरतीला लावतोय हजेरी

प्रतिनिधी : मुंबई आर्यन खान ड्रग्स प्रकरणात 19 दिवस तुरुंगात आहे. तो काहीही न खाता शांतपणे बसत असल्याची चर्चा होती. आता त्याच्या दिनचर्येत थोडा बद

आर्यन खान आज जेलमधून सुटण्याची शक्यता (Video)
अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर (Video)
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

प्रतिनिधी : मुंबई

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात 19 दिवस तुरुंगात आहे. तो काहीही न खाता शांतपणे बसत असल्याची चर्चा होती. आता त्याच्या दिनचर्येत थोडा बदल झाला आहे. 

चर्चेनुसार सुटकेच्या प्रतीक्षेत असलेला आर्यन तुरुंगात रोजच्या आरतीला उपस्थित असतो. कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या बॅरेकमध्ये बांधलेल्या मंदिरात दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होते. आरती पूर्ण होईपर्यंत तो तिथेच राहतो.

आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवरील पार्टी दरम्यान एनसीबीने ताब्यात घेतले. शाहरुख खान गुरुवारी आपल्या मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. 

तो तेथे सुमारे 18 मिनिटे होता. या दरम्यान, त्याचे इंटरकॉमवरून काचेच्या भिंतीच्या मागे उभा असलेल्या आर्यनशी 10 मिनिटे बोलणे झाले.

शाहरुख आणि आर्यन यांची गुरुवारी सुमारे 10 मिनिटे भेट झाली. शाहरुख भेटल्यानंतर परतताच आर्यन पाहुण्यांच्या खोलीतच रडू लागला. या दरम्यान, तुरुंगातील एका रक्षकांनी त्याला गप्प केले. 

एका कैद्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला शांत राहण्यास सांगितले. कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन जेव्हा अभ्यागताच्या खोलीतून परतत होता, तेव्हा सुमारे 20 लोक भेटीच्या खोलीबाहेर रांगेत उभे होते.

COMMENTS