सुपा : येथील ओंकारेश्वर मंदिर आणि संगमेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे सकाळी चार वाजता पवित्र रुद्राभिषेक संपन्न व भगवान शिवांच्या पिंडीवर विधिवत रुद्राभिषेक करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली. सकाळी आठ वाजता महाआरती भक्तिमय वातावरणात शिव आरती करून सर्व भक्तांनी हर हर महादेवचा जयघोष केला. आरती नंतर महाप्रसाद खिचडीचा देण्यात आला. भक्तांना मोफत रुद्राक्षांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी आठ वाजता शिव आरती करण्यात आली. रात्री बारा वाजता अंतिम महाआरती करून कार्यक्रमाचा भक्तिभावाने समारोप करण्यात आला. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन मोहन कसूटकर, यश पवार,ओम पवार,संकेत गायकवाड, प्रज्वल कोल्हे,गणेश ठोंबरे,सतीश जवक,प्रसाद रोकडे,आकाश ढोडा यांनी केले.

सुपा : येथील ओंकारेश्वर मंदिर आणि संगमेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे सकाळी चार वाजता पवित्र रुद्राभिषेक संपन्न व भगवान शिवांच्या पिंडीवर विधिवत रुद्राभिषेक करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली. सकाळी आठ वाजता महाआरती
भक्तिमय वातावरणात शिव आरती करून सर्व भक्तांनी हर हर महादेवचा जयघोष केला. आरती नंतर महाप्रसाद खिचडीचा देण्यात आला. भक्तांना मोफत रुद्राक्षांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी आठ वाजता शिव आरती करण्यात आली. रात्री बारा वाजता अंतिम महाआरती करून कार्यक्रमाचा भक्तिभावाने समारोप करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन मोहन कसूटकर, यश पवार,ओम पवार,संकेत गायकवाड, प्रज्वल कोल्हे,गणेश ठोंबरे,सतीश जवक,प्रसाद रोकडे,आकाश ढोडा यांनी केले.

COMMENTS