बायकोने घेतला नवऱ्याचा मोबाईल… रागाच्या भरात नवऱ्याने चिरला बायकोचा गळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायकोने घेतला नवऱ्याचा मोबाईल… रागाच्या भरात नवऱ्याने चिरला बायकोचा गळा

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील राशीन येथून भांबोरा रस्त्याने जात असताना राहुल सुरेश भोसले याने पत्नी दिपाली भोसले (वय : २५) हिच्या गळ्यावर धा

आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद
अकोल्यातील लक्ष्मी निवास गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीत सागर मैड विजयी
पहिल्यांदा नगरचे 35 विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील राशीन येथून भांबोरा रस्त्याने जात असताना राहुल सुरेश भोसले याने पत्नी दिपाली भोसले (वय : २५) हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिचा खून केला. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मयताची बहीण लता आढाव यांनी कर्जत पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल केला. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीला पकडण्यासाठी करमाळा, दौंड, पुणे येथे पथके रवाना केली. काही तासातच कर्जत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला राशीनच्या सावतामाळी नगर येथून पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अटक केली. आरोपी काटवणात लपून बसलेला होता. पत्नी नांदायला येत नाही, अपमानास्पद वागणूक देते म्हणून हा प्रकार केल्याचे आरोपीने कबूल केले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार तुळशीदास सातपुते, पांडुरंग भांडवलकर, संभाजी वाबळे, गणेश ठोंबरे, शाम जाधव, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, भाऊ काळे, सुनील खैरे व ग्रामस्थांनी ही कारवाई केली.

याबाबतची माहिती अशी, दिपाली भोसले व लता आढाव या दोघी बहिणी भांबोरा रस्त्याने चालत जात होत्या. त्यावेळी समोरून आलेला राहुल सुरेश भोसले हा दिपालीस माझा मोबाईल दे असे म्हणत भांडू लागला. दिपालीने माझ्याजवळ तुझा मोबाईल नाही असे सांगितले. मात्र राहुलने अंगावर धावत येऊन दिपालीवर चाकूने जोरदार हल्ला केला. तिच्या गळ्यावर जोराचे वार केले. त्याने ती खाली कोसळली.

लता आढाव यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुलने त्यांच्या चेहऱ्यावर वार करून जखमी केले. त्यावेळी लता आढाव यांनी हातात असलेल्या जेवणाच्या डब्याच्या सहाय्याने प्रतिकार केला. यावेळी राहुलने चाकू सोबत घेवून पळ काढला. दिपालीला ॲम्बुलन्समधून उपचारासाठी तात्काळ हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

COMMENTS