Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त

राजुरी : येथे बैलगाड्या शर्यतीची मैदानात जेसीबीने चारी काढताना पोलीस. फलटण / प्रतिनिधी : सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या फलटण ताल

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी
राजुरी : येथे बैलगाड्या शर्यतीची मैदानात जेसीबीने चारी काढताना पोलीस.

फलटण / प्रतिनिधी : सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या फलटण तालुका हद्दीत येणार्‍या राजुरी गावामध्ये विनापरवाना बैलगाडा शर्यतीचा डाव आखला असल्याचे चित्र दिसून आल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी कारवाई करत बैलगाडा शर्यतीचा डाव उध्दवस्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि सोलापूर जिल्ह्याच्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मध्यभागी राजुरी गावामध्ये दर रविवारी बैलगाडा शर्यत व जुगाराचे नियोजन केले जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन ग्रामीण पोलीसांनी पहाणी केली. परंतू त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बैलगाड्या, बैल आढळून आले नाहीत. मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी तयार केलेले मैदान (ट्रॅक) आढळून आले. हे शर्यतीचे मैदान जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करत त्या ठिकाणी जागोजागी मोठे खड्डे पाडून त्यामध्ये जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकण्यात आली. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरणार नाहीत, अशी माहिती ग्रामीण पोकलिसांनी दिली असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

COMMENTS