Homeताज्या बातम्या

अमृतवाहिनी बँकेस ‘भारतरत्न सहकारिता’ पुरस्कार

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाह

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले असून देश पातळीवरील विविध तीन पुरस्कारही मिळाले आहेत.
उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे झालेल्या भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट 2026 मध्ये सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेला ‘भारतरत्न सहकारिता’ सन्मान हा पुरस्कार देण्यात आला. तर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना बेस्ट चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना बेस्ट सीईओ, व शून्य एनपीए बद्दल बेस्ट एनपीए मॅनेजमेंटचा पुरस्कार देण्यात आला.
बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद ,ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी यांना बेस्ट सीईओ म्हणून गौरविण्यात आले तर बँकेने मागील आर्थिक वर्षात नेट एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखल्याबद्दल एनपीए मॅनेजमेंटचे अवॉर्ड बँकेला देण्यात आले.
बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ व बँकेचे अधिकारी यांचे बँकेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ऍड.माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

COMMENTS