Homeताज्या बातम्या

मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात  

श्रीगोंदा : दौंड येथील भट्टड हॉस्पिटल आणि मॅगो इंटरनॅशनल प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्

ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम
राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा संशयित रूग्ण


श्रीगोंदा : दौंड येथील भट्टड हॉस्पिटल आणि मॅगो इंटरनॅशनल प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बालकांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ७५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी दौंड येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांचे चिरंजीव डॉ. चिराग भट्टड यांनी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “हे सुंदर जग अनुभवण्यासाठी दृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक अवयव शरीरासाठी आवश्यक असला तरी डोळा हा सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मुलांच्या वाढीच्या काळात त्यांच्या प्रत्येक हालचालींचे निरीक्षण केले जाते. मात्र त्यांच्या दृष्टीमध्ये काही अडचण आहे का, हे बालपणातच ओळखणे आवश्यक असते. त्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे.”
तपासणीदरम्यान सुमारे ३० विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या रेटिना तपासणीची गरज असल्याचे आढळून आले. अशा विद्यार्थ्यांना वेळ देऊन दौंड येथील भट्टड हॉस्पिटलमध्ये मोफत पुढील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चिराग भट्टड यांनी दिली. डॉ. चिराग भट्टड यांच्या या कार्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS