Homeताज्या बातम्या

तीस वर्षांनंतर भेटले श्री संत निळोबाराय विद्यालयाचे सवंगडी  

निघोज : पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राळेगणसिद्धी येथील श्री संत निळोबाराय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  


निघोज : पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राळेगणसिद्धी येथील श्री संत निळोबाराय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९६-९७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३० वर्षांनंतर उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. या वेळी सुमारे ४० माजी विद्यार्थी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्नेहमेळाव्याची सुरुवात शालेय परंपरेनुसार प्रार्थना व परिपाठाने झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत वर्गात बसून पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेतला.  
या प्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक काळे, धावडे, पांडुळे, तिकोने, वाकचौरे, वाघ, रेपाळे, देशमुख, कंद आणि रासकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनेक आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्वर्गीय राऊत यांना अभिवादन करण्यात आले. तसेच दिवंगत विद्यार्थी आणि गुरुजनांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशसेवेत कार्यरत असल्याने उपस्थित राहू न शकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे दृकश्राव्य संवाद साधण्यात आला. त्यामुळे दूर असलेले मित्रदेखील या स्नेहमेळाव्यात सहभागी झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शालेय जीवनातील मधल्या सुट्टीच्या आठवणी जागवत सर्वांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक माजी विद्यार्थ्याला आंब्याचे एक रोप भेट देण्यात आले.  
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब हजारे म्हणाले, “जीवनात अनेक चढ-उतार येतात; मात्र शालेय मैत्री ही सर्वांत निरपेक्ष आणि चिरंतन असते. आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहत ही मैत्री जपली पाहिजे.” त्यांनी माजी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही केले.

COMMENTS