Homeताज्या बातम्या

लिंगायत हटगर कोष्टी समाजाचा सन्मान सोहळा

अहिल्यानगर : लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने रविवारी (दि. ७ जून) गुणवंत विद्यार्थी सत्क

कोपरगावमध्ये मध्यरात्री गुंडांचा हैदोसधारदार शस्त्रे, दांडक्यांसह तरुणांचा ‘राडा’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी  
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद


अहिल्यानगर : लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने रविवारी (दि. ७ जून) गुणवंत विद्यार्थी सत्कार, ज्येष्ठ नागरिक सत्कार, योग व आरोग्य विषयक व्याख्यान तसेच विवाह समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजबांधव व भगिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सुकाणू समितीचे सदस्य यशवंत एरंडे होते. तर महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला उपाध्यक्षा प्रा. शीतल वांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुनील हळगावकर यांनी विवाह समुपदेशन विषयावर मार्गदर्शन केले. तसेच स्वाती सोनसळे यांनी योग व आरोग्याचे महत्त्व विशद करत उपस्थितांना आरोग्यदायी जीवनशैलीबाबत माहिती दिली. भिंगार हटगर कोष्टी समाजाचे अध्यक्ष किशोर कटोरे तसेच जिल्हा सुकाणू समिती सदस्य कैलास बिडवे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप सोनसळे, सुनील कानडे, सुधीर कडते, अशोक गलांडे, सोमनाथ आमले, शाम पारेकर, नितीन सोनसळे, सुजीत गोटे, सीमा वाळूजकर, स्वाती सोनसळे, शुभांगी आमले, संध्या हिकरे, मयुरी ढोले, वैशाली कोंगे, वैशाली काटोरे आणि सुप्रिया बिडवे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा वाळूजकर व संध्या हिकरे यांनी केले. तर आभार सुनील कानडे यांनी मानले.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजबांधव आणि भगिनींचे आभार व्यक्त करण्यात आले.

COMMENTS