Homeताज्या बातम्या

देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील इंधन व गॅसपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचा दावा कें

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा


नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील इंधन व गॅसपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. कच्चे तेल, घरगुती गॅस आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू असून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा देशात उपलब्ध असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण एम. खानूजा यांनी नवी दिल्लीत झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितले की, पश्‍चिम आशियातील घडामोडींमुळे पुरवठा साखळीवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. कच्चे तेल, घरगुती गॅस आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. देशातील शुद्धीकरण प्रकल्प आणि गॅस प्रक्रिया केंद्रांमधून घरगुती गॅसचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. सध्या दररोज सुमारे 52 ते 53 हजार मेट्रिक टन उत्पादन होत असून हे प्रमाण संकटपूर्व कालावधीच्या तुलनेत जवळपास 60 टक्क्यांनी अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घरगुती गॅस वितरकांकडे साठा संपल्याच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले. गॅस सिलिंडर वितरणासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी चार दिवसांपेक्षा कमी झाला आहे. देशातील सुमारे 99 टक्के गॅस सिलिंडर आरक्षण प्रक्रिया आता संगणकीय माध्यमातून होत असून वितरण पडताळणीची अंमलबजावणी सुमारे 96 टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रसायन आणि खते मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा एस. शर्मा यांनी खरीप हंगामासाठी खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, चालू हंगामासाठी आतापर्यंत 86.65 लाख मेट्रिक टन खतांची खरेदी करण्यात आली असून ती एकूण आवश्यकतेच्या 22.57 टक्के आहे. याशिवाय, शेतकर्‍यांनी 11.17 लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांची खरेदी केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 3.20 लाख मेट्रिक टन होते. त्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापराबाबत शेतकर्‍यांमध्ये वाढती जागरूकता दिसून येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

COMMENTS