Homeताज्या बातम्या

दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम

डहाणू ; पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात दोन सख्ख्या बहिणींना विश्‍वासात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरु

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
हॉटेल व्यवसायासाठी ११ लाखांची मागणीविवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा


डहाणू ; पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात दोन सख्ख्या बहिणींना विश्‍वासात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या शोधासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला दोन्ही बहिणींशी ओळख वाढवत त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याने एका तरुणीशी जवळीक साधली. या काळात काही खासगी चित्रफिती तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पुढे या चित्रफिती सार्वजनिक करण्याची तसेच नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याची धमकी देत संबंधित तरुणीवर दबाव टाकण्यात आला. तक्रारीनुसार, आरोपीने या धमक्यांचा आधार घेत वारंवार छळ आणि अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यानंतर त्याने पीडितेच्या अल्पवयीन बहिणीलाही लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही बहिणींना मानसिक दबावाखाली ठेवत दीर्घकाळ त्रास दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या दोन्ही बहिणींनी अखेर धाडस करून डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी संपूर्ण घटना पोलिसांसमोर मांडल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांनुसार तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध पथके कार्यरत केली असून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आरोपीला लवकर अटक करून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS