मुंबई : बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई क

मुंबई : बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार असल्याची माहिती आहे. वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप महेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर आहे.

COMMENTS