Homeताज्या बातम्या

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दा

केज येथे अजित(दादा)पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरवण्याची चिन्हे
ढिगार्‍याखालील जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य


मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक दृढ झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
राज्यसभेतील रिक्त जागेसाठी येत्या 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांच्यावर विश्‍वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर जैन यांचे नाव राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यापूर्वी या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र पक्षांतर्गत सविस्तर विचारविनिमयानंतर अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली होती. राजेंद्र जैन यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत विविध जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी पूर्व विदर्भात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. संघटन कौशल्य, राजकीय समन्वय आणि पक्षनिष्ठा या गुणांच्या जोरावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राजेंद्र जैन यांची ओळख केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून मर्यादित नाही. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी म्हणूनही ओळखले जातात. अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी पडद्यामागून प्रभावी भूमिका बजावली आहे. पूर्व विदर्भात पक्ष संघटना उभी करणे, स्थानिक नेतृत्वात समन्वय साधणे आणि निवडणूक धोरण आखणे यामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यामुळेच राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख शांतपणे काम करणारे पण प्रभावी रणनीतीकार अशी निर्माण झाली आहे. पक्षाने त्यांच्या संघटनात्मक क्षमतेची दखल घेत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेत संधी दिली होती. सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्‍नांवर सातत्याने भूमिका मांडली.

COMMENTS