Homeताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना

तृणमूल काँगे्रसच्या दोन खासदारांचे राजीनामे
राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. गेल्या महिन्यातील दिल्ली भेटीनंतर अल्पावधीतच त्यांनी राजधानीचा दुसरा दौरा केल्याने या हालचालींचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. अधिकृतरीत्या हा दौरा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासोबतच विविध राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.
माहितीनुसार, शिंदे पुढील दोन दिवस दिल्लीत मुक्काम करणार आहेत. या कालावधीत ते पक्षाच्या विविध बैठका, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आणि खासदारांसोबतच्या बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील तसेच राष्ट्रीय राजकारणातील आगामी घडामोडींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्लीत होणार्‍या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासह आगामी निवडणुकांच्या तयारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्याबाहेरील संघटन बळकट करणे, पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडणे आणि विविध राज्यांमधील कार्यकर्त्यांशी समन्वय वाढविणे या मुद्यांवर विचारमंथन अपेक्षित आहे. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेण्यासही या बैठकीत प्राधान्य दिले जाऊ शकते. राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका अधिक ठळक करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 10 जून रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीलाही शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत मित्रपक्षांमधील समन्वय, विविध राज्यांतील राजकीय परिस्थिती, विकासविषयक कार्यक्रम आणि आगामी राजकीय रणनीती यांवर चर्चा अपेक्षित आहे.
पंतप्रधान मोदी द्वेषातून इंडिया आघाडी एकत्र
इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी द्वेषातूनच इंडिया आघाडी एकत्र आली आहे. देशहितापेक्षा पंतप्रधानांविरोधातील राजकीय भूमिका हेच विरोधकांच्या एकत्र येण्यामागचे प्रमुख कारण असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जनतेसमोर विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असून केवळ राजकीय आरोपांमुळे लोकांचा विश्‍वास संपादन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासह आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

COMMENTS