Homeताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली असून प्रचारापेक्षा मतदारांच्या संभाव्

नांदेड विधान परिषद निवडणूक : अंकगणित भाजपच्या बाजूने, पण राजकारण अजूनही उघडेच!
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल
जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर Raigad Marathi News | elections for 210 gram panchayats in the raigad district announced | Latest Raigad News at Lokmat.com


नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली असून प्रचारापेक्षा मतदारांच्या संभाव्य ‘व्यवस्थापनाची’ चर्चा अधिक रंगू लागली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 452 मतदारांवर संपूर्ण निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. परिणामी या मतदारांभोवती राजकीय हालचालींचा वेगही कमालीचा वाढला आहे.
सध्या निवडणूक त्रिकोणी होण्याची शक्यता असली तरी मुख्य लढत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात केंद्रित झाल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही उमेदवार प्रभावशाली राजकीय पार्श्‍वभूमी असलेले असून आर्थिकदृष्ट्याही सक्षम मानले जात असल्याने या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे, निवडणूक जाहीर झाल्यापासून अद्याप दोन्ही प्रमुख उमेदवारांनी बहुतांश मतदारांशी थेट संपर्क साधण्याऐवजी मध्यस्थ, स्थानिक नेते आणि समन्वयकांच्या माध्यमातून संवाद साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढले आहेत. निवडणुकीतील प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याने मतदारांची ‘राजकीय किंमत’ वाढल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो कथित ‘टोकन’ आणि ‘सहल’ राजकारणाचा. काही राजकीय कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील चर्चांनुसार, काही मतदारांना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विशेष सुविधा देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. या चर्चांमध्ये मतदारांना जिल्ह्याबाहेरील पर्यटनस्थळांवर किंवा आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय चर्चांनुसार, मतदानापूर्वी मतदारांना एकत्र ठेवणे, विरोधी पक्षांच्या संपर्कापासून दूर ठेवणे आणि मतदानाच्या दिवशी निश्‍चित मतदान सुनिश्‍चित करणे, ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये वेळोवेळी वापरली जाणारी रणनीती असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे नांदेडमध्येही अशा हालचालींबाबत चर्चा सुरू झाल्याने निवडणुकीच्या वातावरणात अधिकच रंग भरला आहे.
काही सूत्रांच्या मते, मतदारांसाठी विशेष मुक्काम व्यवस्था, पर्यटनस्थळांवरील निवास आणि विविध प्रकारच्या सुविधांची आखणी केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तथापि, या चर्चांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. कोणत्याही उमेदवाराने किंवा पक्षाने अशा हालचालींची सार्वजनिक कबुली दिलेली नसून या सर्व बाबी सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवत मैदानात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रचाराची सूत्रे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मतदारांना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन केल्याची चर्चा आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी स्वतंत्र आणि विवेकपूर्ण निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
राजकीय विश्‍लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका या सर्वसामान्य मतदारांपेक्षा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर आधारित असल्याने येथे राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची असतात. मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रत्येक मताचे महत्त्व प्रचंड वाढते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत संपर्क, समन्वय, गटबांधणी आणि रणनीती यावरच विजय-पराजयाचे गणित अवलंबून असते. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना नांदेडमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. प्रचारसभांपेक्षा बंद दाराआडच्या बैठका, संपर्क मोहिमा, गुप्त रणनीती आणि मतदारांशी सुरू असलेला संवाद अधिक चर्चेत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्‍न चर्चिला जात आहे- विधान परिषदेच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत मतदारांची मते कोणाच्या पारड्यात पडणार? चर्चेत असलेले ‘टोकन राजकारण’, रिसॉर्ट राजकारण आणि मतदार व्यवस्थापनाचे दावे वास्तवात उतरतील की केवळ निवडणुकीच्या अफवा ठरतील? याचे उत्तर मात्र 18 जून रोजी होणार्‍या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
452 मतदार, कोट्यवधींचे राजकारण!
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदारांची संख्या अवघी 452 असली तरी या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मर्यादित मतदारसंख्या, प्रतिष्ठेची लढत आणि प्रमुख राजकीय गटांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर मतदारांशी संपर्क, कथित टोकन, संभाव्य सहली, रिसॉर्ट मुक्काम आणि विविध

COMMENTS