Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्रीच्या श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याकडून एकरकमी प्रतिटन 3056 रुपये देण्याची घोषणा

बिद्री (जि. कोल्हापूर) / प्रतिनिधी : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळ

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
30 गुंठे क्षेत्रात सव्वा दोन लाखाचे तांदळाचे उत्पन्न
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा

बिद्री (जि. कोल्हापूर) / प्रतिनिधी : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी केला जाणार असून गळीताला येणार्‍या प्रतिटन ऊसाला एफआरपी नुसार 3056 रुपये दर एकरक्कमी देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, ही रक्कम सर्वाधिक असल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याच्या सन 2020-21 या गतगळीत हंगामात 6 लाख 80 हजार 427 मे. टन ऊसाचे गाळप करुन 8 लाख 65 हजार 600 क्िंवटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 12.72 टक्के मिळाला. त्यानुसार कारखान्याची एफआरपी 3055.17 रुपये इतकी होते. मात्र, कारखान्याने हि रक्कम 3056 रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच 100 ते 150 रुपये जास्त राहिली आहे. यंदाही हि प्रथा कायम राखली जाईल.
ते म्हणाले, येत्या हंगामासाठी 13 हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. यामधून कारखान्यास 10 लाख मे. टन ऊसाची उपलब्धता होईल. वाढीव विस्तारीकरणामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस लवकरात लवकर गाळप करण्याचा मानस आहे. ऊस उत्पादकांनी ऊस कारखान्यास पाठवून जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा.
यावेळी संचालक गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील व अधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी मानले.

COMMENTS